Marathi News Photo gallery Virat kohli cheteshwar pujara and ajinkya rahane most test runs vs new zealand and england
WTC Final आणि इंग्लंड दौऱ्यात प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखवायला भारताची ही त्रिमूर्तीच बस्स झाली…!
टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' म्हणजेच विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. इंग्लंडच्या भूमीवर असो वा न्यूझीलंडविरूद्ध... कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स गेल्या 10 वर्षात या तिघांनीच केले आहेत. (Virat kohli Cheteshwar Pujara And Ajinkya Rahane)
टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' म्हणजेच विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. इंग्लंडच्या भूमीवर असो वा न्यूझीलंडविरूद्ध... कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स गेल्या 10 वर्षात या तिघांनीच केले आहेत.
Follow us on
भारतीय संघ 24 जणांचा ताफा घेऊन इंग्लंडचा चाललाय तो इतिहास घडविण्यासाठी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चारी मुंड्या चीत करण्यासाठी त्याचीच पुनरावृत्ती इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत करण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. दोन्ही संघाचा बँड वाजविण्यासाठी भारतीय संघातसी त्रिमूर्ती सज्ज आहे. वाचा त्रिमूर्तींची आकडेवारी….
टीम इंडियाची ‘त्रिमूर्ती’ म्हणजेच विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. इंग्लंडच्या भूमीवर असो वा न्यूझीलंडविरूद्ध… कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स गेल्या 10 वर्षात या तिघांनीच केले आहेत.
2010 पासून आतापर्यंत भारताकडून विराट कोहलीने इंग्लंडमध्ये आणि न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये त्याने 36 च्या सरासरीने 727 धावा केल्या आहेत तर न्यूझीलंडविरुद्धच्या 52 च्या सरासरीने त्याने 773 धावा केल्या आहेत.
सध्याच्या टीम इंडियामध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा रहाणे हा दुसरा फलंदाज आहे. २०१० पासून त्याने 29 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. २०१० पासून रहाणेची न्यूझीलंडविरुद्धची सरासरी 50 आहे आणि त्याने 600 धावा केल्या आहेत.
2010 पासून इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा सध्याच्या टीम इंडियामध्ये पुजारा तिसरा फलंदाज आहे. त्याने 29 च्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. या काळात त्याने न्यूझीलंडविरुद्ध 47 च्या सरासरीने 749 धावा केल्या आहेत.