कुणालाच जमला नाही असा विक्रम करुन दाखवणार, विराट WTC फायनलला मैदानात उतरताच किर्तीमान रचणार!

| Updated on: May 15, 2021 | 6:52 AM

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. (Virat Kohli)

1 / 5
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल.  विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

2 / 5
कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

3 / 5
विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

4 / 5
विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

5 / 5
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.