PHOTO | विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, ठरला एकमेव भारतीय कर्णधार
अशी कामगिरी करणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
-
-
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या टी 20 सामन्यात विजयासह मालिकाही जिंकली. टीम इंडियाने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. यासह कर्णधार विराटने ऐतिहासिक कामगिरी केली. विराट ऑस्ट्रेलियाविरोधात तिनही फॉर्मेटमध्ये सीरिज जिंकवून देणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. तर एकूण दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डु प्लेसीसने केली होती.
-
-
कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने पराभव केला होता.
-
-
टीम इंडियाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. मात्र या वेळेस टीम इंडियाला टी 20 सीरिज जिंकण्यास अपयश आले होते. 3 सामन्यांची टी 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. तर उर्वरित 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
-
-
विराट दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात टी 20 मालिका जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीनेही या सर्व संघांविरोधात टी 20 मालिकेत नेतृत्व केलं. मात्र धोनीला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिका जिंकण्यास अपयश आले होते.
-
-
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला 2016 नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. हा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी 8 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.