या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतं तोंड, घरगुती उपायांनी मिळेल आराम

| Updated on: Dec 22, 2022 | 4:56 PM

1 / 5
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन्स खूप गरजेची असतात. त्यांची कमतरता असेल तर अनेक आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे अनेक वेळा तोंड येण्याचा त्रास सहन करावा लागतो. नीट खाता-पिताही येत नाही. तुम्हालाही वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपायांनी आराम मिळू शकेल.

2 / 5
 ज्येष्ठमध - तोंड येण्याचा त्रास असेल तर ज्येष्ठमधाचा वापर हा उत्तम उपाय ठरतो. त्यासाठी ज्येष्ठमध उगाळून ते मधात मिसळावे आणि तोंडात जिथे फोड आला असेल तिथे लावावे. काही वेळातच तिथे होणारी जळजळ कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल.

3 / 5
  वेलची आणि मध - मध आणि वेलची हे दोन्ही घटक तोंडातील फोडावर गुणकारी ठरतात. त्यासाठी वेलचीची पावडर करून त्यात थोडा मध मिसळावा, आणि तोंडात लावावे. थोड्या वेळाने तोंड पाण्याने स्वच्छ धुवावे. नियमित वापराने आराम मिळेल.

4 / 5
हळदीचं पाणी - हळदीच्या पाण्यामुळेही तोंडातील फोडापासून आराम मिळतो. त्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे हळद घालून ते पाणी चांगले उकळावे. गार झाल्यानंतर त्या पाण्याने सकाळ- संध्याकाळ गुळण्या कराव्यात. यामुळे तोंडातील फोडामुळे होणारी जळजळ कमी होऊन आराम मिळेल.

5 / 5
 तूप - तुपाचे अनेक फायदे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे तोंडातील फोड आल्यावर तूप लावल्यास आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी फोड आलेल्या जागी तूप लावायला विसरू नका. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणातही भात किंवा पोळीवर थोडे तूप घ्यावे. तुपाच्या नियमित सेवनाने आराम मिळतो.