PHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विट्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (vitthal mandir decoration Republic day)
1 / 7
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विट्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2 / 7
देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिरातील सजावटीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे.
3 / 7
प्रजासत्ताकदिनाच्या निमीत्ताने मंदिर परिसरात वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात केली आहे.
4 / 7
या सजावटीमध्ये झेंडू, शेवंती, लव्हेन्डर, तसेच कामिनीच्या पानांचा उपयोग करण्यात आला आहे.
5 / 7
विविध फुलांचा वापर करुन मंदिरातील देवाचा गाभारा तिरंगी रंगाने सजवण्यात आला आहे.
6 / 7
विठ्ठल-रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे चढवल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
7 / 7
सोळखांबी सभामंडप, रुक्मिणीमाता गाभारा या परिसरातसुद्धा तेवढीच आकर्षक सजावट केली आहे.