चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. विवोने Vivo Y16 आणि Vivo Y02T स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे
किमतीत कपात केल्यानंतर Vivo Y16 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज बेस व्हेरियंटची किंमत 10499 रुपये केली आहे. 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज रियंटची किंमत 11999 रुपये केली आहे. तर VivoY02T च्या 4GB RAM आमि 64GB स्टोरेज मोबाईलची किंमत 8999 रुपये केली आहे.
Vivo Y16 आणि Vivo Y20T या दोन्ही फोन्समध्ये Media Tech Helio P35 SoC चिपसेट आहे. तसेच 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y16 स्मार्टफोन मध्ये 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तसेच, Vivo Y02T फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे.
स्मार्टफोन्स नो कॉस्ट ईएमआयवर देखील उपलब्ध आहेत. पण हा पर्याय फक्त बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने खरेदी करणाऱ्यांना लागू आहे. हे स्मार्टफोन्स विवोच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन साइटवर उपलब्ध आहेत.