Volkswagen ID.4 GTX : फॉक्सवॅगनच्या नव्या इलेक्ट्रीक कारची जोरदार चर्चा, जाणून फीचर्स आणि किंमत
फॉक्सवॅगननं भारतात नवी इलेक्ट्रिक कार Volkswagen ID.4 GTX सादर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही गाडी चार व्हेरियंटमध्ये विकली जाते. पूर्ण चार्जवर ही गाडी 346 किमीपर्यंतचं अंतर कापू शकते. चला जाणून घेऊयात फीचर्स
1 / 5
भारतीय बाजारात जर्मन ऑटो कंपनीने फॉक्सवॅगननं आपली इलेक्ट्रिक कार Volkswagen ID.4 GTX सादर केली आहे. केरळच्या कोच्चीमध्ये सुरु असलेल्या वार्षिक ब्राँड कॉन्फरन्स 2023 इव्हेंट दरम्यान ही गाडी सादर करण्यात आली आहे. कोच्चीमध्ये सादर केलेली Volkswagen ID.4 GTX टॉप स्पेक मॉडल आहे. (Photo: Volkswagen)
2 / 5
फॉक्सवॅगनची नवी इलेक्ट्रिक कार ड्युअल मोटर आणि ऑल व्हील ड्राईव्ह सेटअप फीचर्ससह येते.जागतिक बाजारापेठेत या गाडीची विक्री चार व्हेरियंटमध्ये होते. प्युअर, प्युअर परफॉर्मन्स आणि प्रो व्हेरियंट सिंगल मोटर RWD सेटअपसह येते. एक व्हेरियंट जीटीएक्स ड्युअल मोटर एडब्ल्यूडीसह येते. (Photo: Volkswagen)
3 / 5
प्युअर आणि प्युअर परफॉर्मंस व्हेरियंट्स एकदा फुल चार्ज केल्यावर 346 किमीपर्यंत रेंज देते. इलेक्ट्रिक कार प्युअर व्हेरियंट 10.9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग धरते. फॉक्सवॅगनच्या या मॉडेलमध्ये 52 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. (Photo: Volkswagen)
4 / 5
प्युअर परफॉर्मंस सिंगल मोटर आरडब्ल्यूडी सेटअपसह कार 9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग पकडू शकते. यात 52 किलोवॅट बॅटरी वापरली गेली आहे. Volkswagen ID.4 GTX च्या प्रो मॉडल मध्ये 77kWh बॅटरी पॅक आहे. (Photo: Volkswagen)
5 / 5
नव्या इलेक्ट्रिक कारचं प्रो मॉडेल 0 ते 100 किमी स्पीड 8.4 सेकंदात पकडते. तर जीटीएक्स व्हेरियंटचा टॉप स्पीड 180 किमी आहे. ही गाडी सिंगल चार्जवर 497 किमी धावते. त्यामुळे लाँग ड्राईव्हला जाताना टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. (Photo: Volkswagen)