25 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच झाला Vu स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स
भारतीय टीव्ही ब्रँड व्यू टेलिविजन्सनं आपला Vu प्रीमियम टीव्ही 2023 लाँच केला आहे. या टीव्हीमध्ये मॉडर्न टेक्नोलॉजीचे सर्व फीचर्स आहेत. या टीव्हीची किंमत 25 हजारांपेक्षा कमी आहे.
1 / 5
व्यू टीव्हीचं 2023 एडिशनच्या 43 इंचाच्या स्क्रिनसाठी 23,999 रुपये, तर 55 इंचाच्या टीव्हीसाठी 32,999 रुपये मोजावे लागतील. हा टीव्ही तुम्ही रिटेल स्टोअर्स व्यतिरिक्त ई कॉमर्स प्लॅटफॉर्म (अमेझॉन, फ्लिपकार्ट, Vutvs.com) वरून विकत घेऊ शकता. (फोटो: VU)
2 / 5
व्यू टीव्हीत 400 निट्सचा ग्लो पॅनल असून A.I GLO प्रोसेसवर चालतो. त्यामुळे टीव्ही पाहण्याचा जबरदस्त आनंद लुटता येणार आहे. (फोटो: VU)
3 / 5
विशेष म्हणजे कंपनी व्हेरियफाईड 24x7 कस्टमर सपोर्ट सर्व्हिस, वॉरंटी आणि रिपेयरिग इन हाउस ऑफर करते. व्यू टीव्हीला ऑनलाईन आणि ऑफलाईन 4.5 स्टारपेक्षा जास्त रेटिंग मिळाली आहे. (फोटो: VU)
4 / 5
हा टीव्ही गुगल ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 50 वॉटचे इनबिल्ड साउंडबार आहेत. तसेच लेटेस्ट ऑनलाईन अॅप्सना सपोर्ट करतो. त्याचबरोबर ओटीटी एक्सेस करणं सहज सोपं आहे. (फोटो: VU)
5 / 5
टीव्ही ऑपरेट करण्यासाठी वॉईस अॅक्टिवेटेड हॉटकी रिमोट कंट्रोल आहे. त्यामुळे तुम्ही सहजरित्या टीव्ही ऑपरेट करू शकता. (फोटो: VU)