अपघातस्थळावरून परत येत असताना मागाहून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने चक्क पोलीस वाहनाला जबर धडक दिली. पोलिसांच्या टाटा सुमो गाडीचा मागच्या भागाचं आणि दर्शनी भागाचं या अपघातात मोठं नुकसान झालंय.
या धडकेत वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला.
वाहनचालक गणेश मेश्राम, पंढरी शेळके, खोडे हे पोलीस कर्मचारी अपघातात जखमी झालेत. जखमींवर वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पिपरी पोहणा परिसरात टिप्पर ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातामुळे अपघातस्थळी वडनेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवलं.
पोलीस कर्मचारी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स परत घेऊन येत असताना मागाहून येणाऱ्या भरधाव वाहनाने जबर धडक देत तेथून पळ काढला.
तीन पोलीस कर्मचारी अपघातात जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, पोलीस वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडनेर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.