अवघा रंग एक झाला… टाळ-मृदंगाचा गजरात वारकरी दंग; घरबसल्या वारीची अनुभव देणारे फोटो

| Updated on: Jul 16, 2024 | 7:56 PM

Wari 2024 Photos : वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत. आता आस आहे ती विठ्ठलाच्या दर्शनाची... कित्येक मैल चालल्यानंतर आता विठ्ठल भक्तांना आस आहे ती लाडक्या विठूरायाच्या दर्शनाची... विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघे काही तास उरलेत. पाहा काही खास फोटो....

1 / 5
 टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... ज्ञानोबा माऊलीचा अखंड जयघोष... देहभान विसरून नाचणारे वारकरी... भाविकांची अलोट गर्दी... हा फोटो पाहिला की या ओळी आठवतात.

2 / 5
महिनाभर पायी वारी केल्यानंतर वारकऱ्यांना आता आस आहे ती विठू माऊलीच्या दर्शनाची... महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेला वारकरी अन् त्यांचा लाडका विठूराया यांच्या भेटीला अवघे काही तास उरलेत.

3 / 5
महाराष्ट्र पर्यटन विभागाने यंदाच्या वारीतील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. फोटोग्राफर निखिल सिंह यांनी काढलेले वारकऱ्यांचे हे खास फोटो महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून शेअर करण्यात आले आहेत.

4 / 5
वाखरीतील रिंगण सोहळ्यातील हे खास फोटो आहेत. ओसंडून वाहणाऱ्या भक्तिरसात अश्वांनी रंगविलेल्या रिंगणाने लाखो भाविक दंग होतात, हाच तो क्षण... त्यामुळे एकदा तरी वारी अनुभवायला हवी....

5 / 5
वारीतील हा उत्साह पाहिला की  संत सोयराबाई यांचा 'अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग... मी तूंपण गेले वायां, पाहतां पंढरीचा राया...' हा अभंग आठवल्या शिवाय राहत नाही. घरबसल्या वारीची अनुभव देणारे काही खास फोटो...