सप्तशृंगी देवीला तब्बल 500 किलो द्राक्षांची आरास! होळी पौर्णिमेनिमित्त खास सजावट

| Updated on: Mar 18, 2022 | 10:01 PM

या सजावटीसाठी एक पूर्ण दिवस लागला. होलिकोत्सवाच्या अखेरीस सुदर्शनयाग करून देवीच्या उत्सवाची सांगता करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांना याच द्राक्षांचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.

1 / 5
होळी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगीला 500 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

2 / 5
होळी पौर्णिमेच्या मुहुर्तांवर 50 किलो द्राक्षांबरोबर फुले व पानांचा आकर्षक वापर करून तयार केलेले तोरण तसेच झुंबरामुळे वणीच्या सप्तशृंगी देवीचे रूप असे खुलून गेले होते.

3 / 5
निफाड तालुक्यातील कुंभारी  येथील देवीभक्त जयराम जाधव यांच्या पुढाकाराने नाशिकचे कलाकार हेमानी जेठवा व अवधूत देशपांडे यांनी ही आरास बनवली.

4 / 5
या सजावटीसाठी एक पूर्ण दिवस लागला. होलिकोत्सवाच्या अखेरीस सुदर्शनयाग करून देवीच्या उत्सवाची सांगता करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांना याच द्राक्षांचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.

या सजावटीसाठी एक पूर्ण दिवस लागला. होलिकोत्सवाच्या अखेरीस सुदर्शनयाग करून देवीच्या उत्सवाची सांगता करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांना याच द्राक्षांचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.

5 / 5
बहुधा देवीला फुलांचीच आकर्षक सजावट करून सोन्या चांदीच्या आभूषणांनी सजवण्यात येत होते. मात्र शाकांबरी उत्सवानंतर दुसऱ्यांदा देवीला फळांनी सजवण्यात आलं होतं.