मुंबईकरांसाठी आजचा दिवस कसोटीचा आहे. कारण आज मुंबईतील काही भागांमध्ये पाणीकपात केली जाणार आहे.त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
मुंबईतील काही भागांमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक 1 ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेतर्फे मलबाह हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. ही समिती आज पाहणी करेन.
या पाहणीमुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही भागात आज 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभागा अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी कपात होणार आहे. सोमवारी म्हणजे 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.