अमृताचा पेला, मायेची ऊब तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी पाणपोई, छताची सोय
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) दिला असताना उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 ते 41 डिग्री वर गेले आहे , दुपारी तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
1 / 5
राज्यभरात मागील महिन्यात अचानक उष्णतेची लाट (Heat wave) आली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत मार्च महिन्यातच उन्हाचा आणि गर्मीचा कहर जाणवत होता. औरंगाबादेत तर तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला होता.
2 / 5
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही सूर्य चांगलाच तळपू लागला होता. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) दिला असताना उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 ते 41 डिग्री वर गेले आहे , दुपारी तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
3 / 5
यासाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने मंदिर व शेजारील परिसरात छत व पडदे उभे केले असून तुळजापूर शहरात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
4 / 5
तुळजाभवानी देवीच मंदिर देखणा, पायऱ्या व फरशी या दोन्ही दगडी असल्याने उन्हात भाविकांच्या पायांना चटके बसत होते मात्र छताची सोय केल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.
5 / 5
तर उन्हाळ्यात पाणी पाणी होत असल्याने भाविकांना मंदिर व तुळजापूर शहरात विविध ठिकाणी पानपोई सुरु केल्या आहेत त्यामुळे याचा फायदा भविक व पुजारी आणी व्यापारी यांना पण होताना दिसत आहे.