बॉलिवूडच्या “मिल्खा सिंग”ची बॅचलर रेस संपली, फरहान-शिबानीच्या लग्नाचे फोटो पाहा
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आज लग्नगाठ बांधली. हे मोस्ट वेटेड लग्न अखेर आज पार पडलं. खंडाळ्यात या दोघांचं लग्न झालं.
1 / 5
बॉलिवूडचा मिल्खा सिंग म्हणून ओळखला जाणार अभिनेता फरहान अख्तर आता बॅचलर नाही राहिला. त्याने शिबानी दांडेकरसोबत आजच लग्नगाठ बांधली आहे.खंडाळ्यात या दोघांचं लग्न झालं. अनेक सेलिब्रिटींनी या ग्रॅण्ड वेडिंगला हजेरी लावली.
2 / 5
शिबानी दांडेकर ही मॉडेल तर आहेच. मात्र ती क्रिकेटच्या सुत्रसंचलानामुळेही प्रचंड गाजली आहे. तिने अनेक चित्रपटात आयटम नंबरही केले आहेत. तसेच तीची एक ओळख गायीका अशीही आहे.
3 / 5
फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केले होते. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला.
4 / 5
फरहान अख्तरच्या प्रमुख चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याने ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये लेखनाचे काम केले आहे. याशिवाय त्याने ‘डॉन’, ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करत दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.
5 / 5
फरहान अख्तर आणि मॉडेल-अभिनेत्री शिबानी दांडेकर हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. त्याचे एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर करताना दिसतात.आता हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. (फोटो-टीव्ही 9 मराठी)