Marathi News Photo gallery What did Prime Minister Modi say? That actor Kichha Sudeep also gave his reaction to the language controversy; Learn from Photo Story
Kiccha Sudeepa : काय म्हणाले पंतप्रधान मोदी? की अभिनेता किच्चा सुदीपनेही भाषा वादावर दिली आपली प्रतिक्रिया ; जाणून घ्या फोटो स्टोरीतून
भारतात सर्व भाषांना वेगळे स्थान आहे. इतर भाषांचा अनादर कोणीही करू शकत नाही. आपल्या भाषेचा सन्मान व्हावा असे वाटत असताना इतर भाषांचाही आदर करायला शिकायला नको का? असे त्याने म्हटले आहे.
1 / 9
काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांच्यात हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाला होता.
2 / 9
सुदीपने म्हटले होते हिंदी आता आपली राष्ट्रभाषा नाही कारण तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये भाषांमध्ये डब करून पॅन इंडिया चित्रपट बनवत आहे. किच्छा सुदीपने KGF 2 च्या यशावर आधारित हे विधान केलं होते. त्याच्यात या विधानावर बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने ट्विट करत त्याला फटकारले होते.
3 / 9
सुदीपल उत्तर देताना अजय देवगण म्हणाला होता की, जर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? त्यानंतर ट्विटरचा उत्तर -प्रतिउत्तरे झाली होती. दोघांनी एकमेकांना अनेक उत्तरे दिली, स्पष्टीकरणही दिले होते.
4 / 9
नुकतेच जयपूरमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या काही दिवसांमध्ये, आम्ही पाहिले आहे की, भाषांवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे.
5 / 9
भाजपला प्रत्येक प्रादेशिक भाषेत भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. भाजपनेच प्रथमच भारताची संस्कृती आणि भाषा यांना राष्ट्राच्या सन्मानाशी जोडले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात (NEP) आम्ही प्रादेशिक भाषांना महत्त्व देत आहोत. यावरून प्रत्येक प्रादेशिक भाषेबद्दलची आमची बांधिलकी दिसून येते."असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
6 / 9
पंतप्रधान यांच्या बोलण्यानंतर सुदीपने आपले मत व्यक्त करताना म्हटलं की प्रत्येकाची भाषा त्यांच्या आईसारखी असते. याचा अर्थ असा नाही की आपण इतर भाषांचा आदर करत नाही किंवा अभिमान बाळगत नाही.
7 / 9
पीएम मोदींचे हे शब्द ऐकून आनंद झाला.त्यांनी देशातील प्रत्येक भाषेच्या महत्त्वावर भर दिला आणि सांगितले की प्रत्येक भाषेचा समान आदर करण्याची गरज आहे.” असे किच्चा सुदीपने म्हटले आहे.
8 / 9
भारतात सर्व भाषांना वेगळे स्थान आहे. इतर भाषांचा अनादर कोणीही करू शकत नाही. आपल्या भाषेचा सन्मान व्हावा असे वाटत असताना इतर भाषांचाही आदर करायला शिकायला नको का? असे त्याने म्हटले आहे.
9 / 9
किच्चा सुदीपने अनेक कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचे 'किच्चा प्रॉडक्शन' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याच्या बॅनरखाली त्याने अनेक चित्रपट बनवले आहेत.