तुम्ही रोज वापरणाऱ्या या गोष्टी पाकिस्तानातून येतात माहीत आहे का ? शेजारच्या देशातून काय खरेदी करतो आपण?
What does India buy from Pakistan : भारत आणि पाकिस्तानचे व्यापारी संबंध तितकेसे चांगले नाहीत, ताणलेले आहेत. पण तरीही भारत पाकिस्तानकडून या 10 वस्तू खरेदी करतो.
1 / 9
भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पाकिस्तानमध्ये दहशतवाद फोफावत असून भारताचा त्याला कडाडून विरोध आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध 2019 पासून स्थगित आहेत. खरे तर भारत सरकारने 29019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं, ही गोष्ट काही पाकिस्तानच्या पचनी पडली नाही. त्यानंतर त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या गोष्टींवर बंदी घातली होती. तर पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के टॅक्स लावला. तसेच भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जाही रद्द केला. मात्र असं असलं तरी दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टींबद्दल व्यापारी संबंध कायम आहेत. ( photos : Social Media ? Freepik)
2 / 9
2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सचा एकूण व्यापार होता. हे आकडे कमी-अधिक असू शकतात. भारत अजूनही पाकिस्तानकडून अनेक वस्तू खरेदी करतो. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.
3 / 9
भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुका मेवा खरेदी करतो. यासोबतच पाकिस्तानकडून ताजी फळेही विकत घेतली जातात.
4 / 9
बिनानी सिमेंट ही भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे जिचे भारतीय बाजारपेठेत मोठं अस्तित्व आहे. पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल ती म्हणजे बिनानी सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानात होतं.
5 / 9
भारतात सैंधव मीठाचा खप खूप आहे. व्रत-वैकल्यांच्या काळात तर अनेक लोकं हे आयोडिनयुक्त मीठाऐवजी रॉक सॉल्ट (खडं मीठ) वापरतात. भारत सर्वांत जास्त सैंधव मीठ हे पाकिस्तानमधून मागवतं. पाकिस्तान हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे रॉक मीठ मोठ्या प्रमाणात आढळते.
6 / 9
अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी माती ही देखील पाकिस्तानमधून येते.
7 / 9
एवढंच नव्हे तर चष्म्यांमध्ये वापरण्यात येणारे ऑप्टिक्सही पाकिस्तानमधून येतात. याशिवाय पाकिस्तानकडून कुर्ते आणि पेशावरी चप्पल खरेदी केले जाते.
8 / 9
रॉक मीठ आणि सिमेंट व्यतिरिक्त भारत पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात चामड्याच्या वस्तूंची आयात केली जाते.
9 / 9
या व्यतिरिक्त पाकिस्तान भारताला मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात करतो. यासोबतच भारत शेजारील देशांकडून मोठ्या प्रमाणात स्टील आणि तांबे खरेदी करतो.