Numerology : सोमवर 10 एप्रिल 2023 साठी कोणता नंबर आणि रंग ठरेल लकी, जाणून घ्या
Numerology : 10 एप्रिल 2023 रोजी सोमवार आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा अंमल असतो. शुभ अंकांच्या मदतीने घर, वाहन आणि मोबाईल नंबर घेतल्यास फायदा होतो. जन्मतारीख आणि तारखेची पूर्ण बेरीज केली की मूलांक आणि भाग्यांक काढला जातो.
-
-
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 4 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 0+4+0+4+2+0+2+3 = 6 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 14 ही जन्मतारीख असेल तर 1+4 असं करत मुलांक 5 येईल.
-
-
आज लोकांना भेटण्याचा दिवस आहे. काही जुन्या लोकांची भेट झाल्याने दिवस चांगला जाईल. त्यामुळे उत्साह आणि चांगला अनुभव गाठीशी येईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
-
-
कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना काळजी घ्या. तुमचा विश्वास घात होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपच्या धंद्यात दुर्लक्ष करू नका फटका बसू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.
-
-
कितीही अडचण आली तरी इच्छा तिथे मार्ग हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या उत्साहामुळे नवीन उंची गाठाला. प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा असेल.
-
-
आयुष्यात बदल होत राहणं गरजेचं आहे. घरात काही कारणावरून वाद होऊ शकतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने पुढे जा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा असेल.
-
-
कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कामात कोणतीही हयगय करू नका. कदाचित चुकीच्या निर्णयाचा फटका बसू शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी असेल.
-
-
जोडीदारासोबत आजचा दिवस घालवण्याचा योग आहे. त्यामुळे अडचणीत एकमेकांची साथ मिळेल. कुटुंबासोबत वाद होईल असं अजिबात वागू नका. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा असेल.
-
-
तुम्हाला महत्त्वपूर्ण करार करण्यासाठी दिवस चांगला आहे. या चर्चेतून निश्चितच फायदा होईल. जर अविवाहित असाल तर स्थळ येण्याची शक्यता आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा असेल.
-
-
दिवस उर्जेने भरलेला असेल त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. काही जुन्या आठवणींमुळे मन भरून येईल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.
-
-
अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल दिसून येईल. एखाद्यावर सहज विश्वास टाकू नका. शहनिशा करूनच निर्णय घ्या. कारण चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)