Numerology : 2 एप्रिल 2023 चं अंकशास्त्र काय सांगते? रविवारसाठी लकी नंबर आणि शुभ रंग कोणता? जाणून घ्या
तुम्हीही तुमच्या जन्म तारखेची बेरीज करून भाग्यांक आणि काढू शकता. कसं काढायचं आणि तुम्हाला 2 एप्रिल 2023 हा दिवस कसा जाईल याचा अंदाज घ्या. प्रत्येक अंकावर ग्रहांचं अंमल असतो.
1 / 10
ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचं गणितही महत्त्वाचं ठरतं. मुल्यांक आणि भाग्यांक द्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. तारखेची बेरीज आणि जन्मतारीख यावर अंकशास्त्र आधारित आहे. 2 एप्रिल 2023 या तारखेचा मुलांक 2 हा आहे. तर भाग्यांक 0+2+0+4+2+0+2+3 = 4 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 11 ही जन्मतारीख असेल तर 1+1 असं करत मुलांक 2 येईल. दैनिक जीवनात मुलांकाच्या आधारावर तुमच्यासाठी 2 एप्रिल हा दिवस कसा असेल, जाणून घ्या
2 / 10
मूलांक 1 असलेल्या जातकांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या हातून चुकीचं काम होणार नाही ना याची काळजी घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे झुकाव असेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग केसरी असणार आहे.
3 / 10
मूलांक 2 असलेल्या जातकांना अचानकपणे काही गोष्टींची आठवण येईल. भावनिक स्थितीत पूर्ण दिवस जाईल. आळसपणा झटकून कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.
4 / 10
मूलांक 3 असलेल्या जातकांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. कायदेशीर कामात योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या. एकटेपणा जाणवू शकतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा असेल.
5 / 10
मूलांक 4 असलेल्या जातकांनी वाद होईल असं वागू नये. भांडणामुळे नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा असेल.
6 / 10
मूलांक 5 असलेल्या जातकांनी आपल्या कौटुंबिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं. कारण तुमच्या चुकीच्या वागण्याचा कुटुंबावर परिणा होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण तुम्हालाच त्रास होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी असणार आहे.
7 / 10
मूलांक 6 असलेल्या जातकांनी मेहनतीला पर्याय नाही असं ठामपणे निश्चित करावं. काम करत राहावं तुम्हाला अपेक्षित निकाल आठवड्याभरात दिसून येईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा असेल.
8 / 10
मूलांक 7 असलेल्या जातकांनी प्राथमिक गरजांकडे लक्ष केंद्रीत करावं. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. त्यामुळे तुमचं नाहक नुकसान होऊ शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा असेल.
9 / 10
मूलांक 8 असलेल्या जातकांना नव्या संधी चालून येतील. तुमच्या नेतृत्व गुणांचं या काळात कौतुक होईल. पती पत्नीमध्ये थोड्या कारणावरून वाद होऊ शकतात. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.
10 / 10
मूलांक 9 असलेल्या जातकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा दर्शवत आहे. दुसरीकडे एखाद्या काम पुर्णत्वास नेण्यास जोर लावा. मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)