Hyundai Venue : वेन्यू म्हणजे ठिकाण..एक असं ठिकाण जे तुम्हाला पाहायचं आहे. ते ठिकाण गाठणं सोपं आहे, असा यामागचा अर्थ सांगतो. गाडीसाठी हे नाव युनिक आणि स्टायलिश वाटल्याने कंपनीने ठेवलं असावं.
Tata Nexon : टाटा नेक्सॉन हे नाव नेपाळी भाषेशी निगडीत आहे. नेक्सॉन म्हणजेच हिरा आणि ज्वेलरी असा होतो.
Kia Sonnet : सॉनेट हे नाव Sonnet शब्दातून घेतला. ही एक 14 लाइन्सची कविता आहे. या कवितेत एक पूर्ण विचार, कल्पना आणि भावनांचा संदर्भ आहे.
Tata Harrier : हॅरियर हे एका पक्ष्याचं नाव आहे. हे पक्षी छोट्या किटक, प्राण्यांची शिकार करतात. उंच आकाशात मुक्तपणे भरारी घेतात.
Tata Safari : सफारी या शब्दातच सर्व काही येतं. सफर या शब्दाचा अर्थ फिरणे असा होतो. म्हणजेच या गाडीतून फिरण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असं दर्शवलं आहे.
Skoda Kushaq :कुशाक या शब्दाचा अर्थ तसं समजणं कठीण आहे. कारण हा शब्द संस्कृतमधून घेतला आहे. संस्कृतमध्ये याचा अर्थ राजा किंवा सम्राट असा होतो.
volkswagon Taigun : ही गाडी अॅडव्हेंचर्स आहे हे दर्शवण्यासाठी हे नाव घेतलं आहे. नावाप्रमाणे गाडी आहे असं त्यातून स्पष्ट होतं.
Mahindra Scorpio N : स्कॉर्पियो म्हणजे विंचू..पण या गाडीकडे पाहिल्यावर भारदस्त वाटते. म्हणजे एखाद्या रानवाटेवर फिरण्यासाठी उत्तम गाडी आहे. या गाडीची मागचा भाग आणि खिडक्या नाव अधोरेखित करतात.
Hyundai Creta : भारतीय बाजारातील एक लोकप्रिय एसयुव्ही आहे. या गाडीचं नाव ग्रीक आयर्लंडवरून ठेवण्यात आलं आहे.
Toyota Fortuner : फॉर्च्युन हे नाव इंग्लिश आहे. त्याचा अर्थ धन, संपत्ती असा होतो.