आता परवानगीशिवाय कोणालाही करता येणार नाही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड, नवीन ट्रिक काय?
आजकाल तुम्हाला कोणीही कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करते. यामुळे तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपचा सदस्य बनून राहावं लागतं. मात्र आता यावर व्हॉट्सअॅपने एक युक्ती शोधली आहे.
1 / 11
व्हॉट्सॲप हे हल्ली आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. आपण एका क्लिकवर मेसेज पाठण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी व्हॉट्सॲपद्वारे करु शकतो.
2 / 11
जगभरात व्हॉट्सॲपचे कोट्यावधी युजर्स असून यामुळे त्यांचे काम हलकं झालं आहे. जर तुम्हाला एकाच वेळी असंख्य लोकांशी संवाद साधायचा असेल किंवा मेसेज पाठवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी व्हॉट्सॲपने खास सुविधा करुन दिली आहे. ही सुविधा म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप.
3 / 11
व्हॉट्सॲप ग्रुप हा तुमच्या ऑफिसचा, कॉलेजचा, शाळेतल्या मित्र-मैत्रिणींचा अगदीच काय तर शाळा-कॉलेजच्या महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी व्हॉट्सॲपचा पर्याय अवलंबला जातो.
4 / 11
पण आजकाल तुम्हाला कोणीही कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करते. यामुळे तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपचा सदस्य बनून राहावं लागतं. मात्र आता यावर व्हॉट्सॲपने एक युक्ती शोधली आहे.
5 / 11
WhatsApp ने नुकतंच एक नवीन फिचर अपडेट केले आहे. या फिचरद्वारे तुम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये कोण ॲड करू शकतं आणि कोण करू शकत नाही, यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
6 / 11
WhatsApp चे हे नवीन फिचर सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या फोनवर व्हॉट्सॲप ओपन करावं लागेल.
7 / 11
त्यानंतर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात तीन ठिपके दिसतील, त्यावर क्लिक करा.
8 / 11
यानंतर Settings या पर्यायावर क्लिक करा. यानंतर खाली दिलेल्या प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा.
9 / 11
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रुप असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तीन वेगवेगळे पर्याय दिसतील. या तीन पर्यायांपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता.
10 / 11
यात Everyone, My contacts, My contacts except असे तीन पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो त्याची निवड करा.
11 / 11
जर तुम्ही माय कॉन्टॅक्ट्स निवडलात तर तुम्हाला तुमच्या फोन कॉन्टॅक्ट्स लिस्टमधील लोक तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू शकतात. तसेच तुम्ही Nobody वर क्लिक केल्यास तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये ॲड करू शकत नाही.