Marathi News Photo gallery Where is Banjara Virasat Museum will be inaugurated by PM Narendra Modi Poharadevi Latest Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारं ‘बंजारा विरासत’ नेमकं काय?
Where is Banjara Virasat Museum : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणारं 'बंजारा विरासत' नेमकं काय आहे? 'बंजारा विरासत' कुठे आहे? याचं बंजारा समाजाच्या दृष्टीने महत्व काय आहे? नंगारा वास्तुसंग्रहालयात नेमकं काय आहे? वाचा सविस्तर बातमी...
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील पोहरादेवी इथं नरेंद्र मोदी जाणार आहेत. जगदंबा माता मंदिर आणि संत सेवलाल महाराज,संत रामराव महाराज समाधी दर्शन मोदी घेणार आहेत.
2 / 6
आजच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बंजारा विरासत'चं लोकार्पण केलं जाणार आहे. बंजाराच्या समाजाच्या संस्कृतीचं दर्शन या 'बंजारा विरासत'मधून लोकांना होणार आहे. नंगारा वास्तुसंग्रहालय म्हणजे बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन असणार आहे.
3 / 6
देशभरातील बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणारं 'बंजारा विरासत' सर्वसामान्यांसाठी आजपासून खुलं होणार आहे. नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण आज होणार आहे. या वास्तू संग्राहलयात बंजारा समाजाचा इतिहास रेखाटला गेला आहे. येत्या काळात हे संग्रहालय पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
4 / 6
बंजारा समाजातील नंगारा वाद्याला असाधारण महत्त्व आहे. 'नंगारार घोरेम रिझो गोरमाटी' या वाक्यानेच या वाद्याच्या महत्त्वाची स्पष्टता मिळते. पूर्वी भटकंती अवस्थेतील बंजारा समाजाने नंगारा वाद्याचा वापर संकटाची सूचना देण्यासाठी केला जात होता. एखाद्या संकटाची चाहूल लागली की नंगारा वाजवला जायचा, ज्यामुळे समाजातील लोक सावध होत होता.
5 / 6
वाशीम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे स्थापन झालेल्या नंगारा वास्तु संग्रहालयात बंजारा संस्कृतीचे विविध पैलू दर्शविणारे 13 गॅलरी आहेत. या संग्रहालयात बंजारा समाजाच्या प्रवासाचे चित्रण केलेलं आहे.
6 / 6
भटकंती जीवनशैलीपासून शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग निवडला आहे. याच वास्तूचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ज्यामुळे वाशीम आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक गौरवाची बाब ठरणार आहे.