टीम इंडियाचा जबरदस्त फलंदाज पृथ्वी शॉ सध्या गरबा शिकण्यात व्यस्त असल्याची माहिती मिळाली आहे. पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो गरबा शिकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पृथ्वी शॉला गरबा शिकवणारी ती मिस्ट्री गर्ल कोण आहे अशी सगळीकडे चर्चा सुरु आहे.
त्या मिस्ट्री गर्लचं नाव निधि तपाड़िया असं आहे. मागच्या काही दिवसांपासून दोघं एकमेकाला डेट करीत असल्याची अफवा आहे.
निधी इंटरनेट आणि सोशल मीडियावरती स्टार आहे. तसेच ती मॉडेलिंग सुद्धा करते. तिचे अधिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निधीने पृथ्वीला गरबा शिकवला म्हणून त्याने निधीचे आभार सुद्धा सोशल मीडियावर मानले आहेत.