खराब हवा असलेल्या देशात भारताचा क्रमांक पाचवा आला आहे. परंतू साल २०२३ मध्ये भारताचे स्थान सातवे होते. या शिवाय चाड, बांग्लादेश सारख्या देशाची अवस्था वाईट आहेत. जगातील सात स्वच्छ हवामानाच्या देशात आशियातील एकाही देशांचा समा
आईसलँड हा नॉर्डिक बेटातील देश असून या देशाला सौदर्याचे वरदान आहे.हा देश तेथील सुंदर निसर्गासाठी कायम चर्चे असतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या देशाची हवा उत्तम असून श्वास घेण्यासाठी चांगली आहे.
ग्रेनाडा हा दक्षिण पूर्वी कॅरेबियन सागरातील ग्रेनेडियन्सच्या दक्षिणी टोकावर असलेला स्थित एक बेटांचा देश आहे.ग्रेनाडा बेट आणि सहा छोट्या छोट्या देशांनी बनून तो बनला आहे. या देशाची लोकसंख्या केवळ १.१७ लाख इतकी आहे.
WHO च्या मानकांनुसार ऑस्ट्रेलियातील हवा अगदम स्वच्छ आहे. या ऑस्ट्रेलियातील विरळ लोकवस्ती आणि मोठे क्षेत्रफळाचा देश असल्याने येथे हवा अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायक असल्याचे म्हटले जाते.
IQAir च्या यादी बार्बोडोस या देशाचे देखील नाव सामील आहे.IQAir च्या यादीनुसार बार्बोडोसची हवा एकदम स्वच्छ आणि साफ आहे.उत्तर अमेरिकेतील हा अतिशय छोटा देश असून त्याची लोकसंख्या २.८ लाख इतकी आहे.
कॅरेबियन देश बाहामासची लोकसंख्या केवळ ४ लाख इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते येथील हवा अत्यंत आरोग्यदायी आहे.
बाल्टीक क्षेत्रातील एस्टोनिया या देशाचे हवामान देखील आल्हाददायक आहे.एस्टोनियाची हवा देखील चांगली आहे. बाल्टीक क्षेत्रातील या देशाची लोकसंख्या केवळ १३ लाख आहे.
न्युझीलंड या देशाचे हवामान नेहमीच स्वच्छ असते. दोन मोठी आणि अनेक छोट्या बेटांचा समुह असलेला हा देश अत्यंता विरळ लोकसंख्येचा आहे. या देशाची लोकसंख्या ५२ लाख आहे. न्युझीलंडला खुप सुंदर देश म्हटले जाते. येथील हवा स्वच्छ असून जंगल,तलाव आणि अनेक नैसर्गिक नजारे येथे पहायला मिळतात.