शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?
अमरावती : शेतकरी राजा कधी काय करेल याचा नियम नाही. काळाच्या ओघात काहीही बदल झाले तरी बैलजोडी आणि शेतकऱ्याचं नातं हे वेगळेच आहे. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्याने वेगळाच नाद केला आहे. मुलाच्या लग्नाचे वऱ्हाड थेट बैलगाडीतून समारंभ ठिकाणी मार्गस्थ केले आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव येथील शेतकऱ्याने मुलाच्या लग्नाची वरात ही बैलगाडीतून काढली आहे. शिरजगाव ते अनकवाडी असा 10 किमीचा प्रवास करुन हे वऱ्हाड लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहचले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्याने ही नामी शक्कल लढवली आहे. सध्या या वऱ्हाडाची मोठी चर्चा रंगली आहे.