संध्याकाळी कचरा का काढायचा नाही, आजीच्या सल्ल्यामागील शास्त्र आणि तर्क काय?

| Updated on: Mar 17, 2025 | 5:10 PM

सूर्यास्तानंतर कचरा बाहेर टाकण्यामागे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील अनेक कारणे आहेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी नावाची देवी नाराज होते असे मानले जाते. पूर्वी वीज नसल्याने रात्री कचरा बाहेर टाकणे धोकादायक होते.

1 / 10
आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. तरीही काही पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टींचा आपण आजही पाळतो. यातील काही गोष्टींना तर्क असतो, तर कधी कधी काहीही तर्क नसतो.

2 / 10
घर, ऑफिस, दुकान, हॉटेल किंवा इतर कोणतीही वास्तू बांधताना सर्वप्रथम वास्तुशास्त्र पाहिले जाते. वास्तुशास्त्रामुळे तुम्हाला नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यास मदत होते. वास्तूशास्त्राचे अनेक फायदे आहेत.

3 / 10
आज आम्ही तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर घराबाहेर कचरा का टाकू नये यामागचे शास्त्र किंवा तर्क सांगणार आहोत.

4 / 10
सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्यानंतर काढलेला कचरा किंवा माती बाहेर टाकू नका. ते कुठेतरी कचराकुंडीत टाका आणि सकाळी बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर माती फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.

5 / 10
ज्योतिषशास्त्रातही संध्याकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते. रात्रीचा काळ हा राहू आणि केतूच्या प्रभावाचा काळ असतो. हा काळ असुरी शक्तींचा असतो.

6 / 10
रात्री झाडू मारल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. रात्री घरात झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

7 / 10
जर तुम्ही संध्याकाळी कामावरुन परत असाल आणि घरात कचरा झाला असेल तर तुम्ही स्वच्छता करणे गरजेचे आहे.

8 / 10
पण सूर्यास्तानंतर जर तुम्ही झाडू काढून कचरा काढला तर तो घरात कचराकुंडीत टाका किंवा झाडात टाका. सकाळी तो कचरा बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर कचरा टाकल्याने लक्ष्मी घराबाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते, असे वास्तूशास्त्रात म्हटले जाते.

9 / 10
आता यामागील तर्क समोर आले आहे. पूर्वी, गावांमध्ये वीज नव्हती, त्यामुळे तेव्हा संध्याकाळनंतर कचरा बाहेर काढला जात नव्हता. कचऱ्यासोबत कोणत्याही मौल्यवान वस्तू बाहेर फेकल्या जाऊ नयेत असे यामागील कारण होते.

10 / 10
याच कारणाने आजही वडीलधारी माणसे संध्याकाळी कचरा बाहेर काढू देत नाहीत. पण सध्या यात बदल झाला आहे. सध्या सर्वत्र वीज आली आहे. पूर्वी एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आता राहिलेली नाही. पण आजही लोक त्यांच्या वडिलांच्या शब्दांचा आदर करून श्रद्धेचे पालन करतात.