शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
खेळाडूंचे च्युइंगम चघळणे हे केवळ सवय नाही तर त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. त्यामुळेच अनेक खेळाडू मैदानावर च्युइंगम चघळताना दिसतात. च्युइंगम चघळल्याने नेमके काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
1 / 5
बहुतांश खेळामध्ये खेळाडू मैदानात च्युइंग गम चघळताना दिसतात. काही खेळाडू नको त्या वेळी च्युइंग गम चघळताना दिसल्याने ट्रोल देखील झाले आहेत. च्युइंगम खाणे ही काय फॅशन नसून त्यामागे खास कारण आहे. शास्त्रीय कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.
2 / 5
च्युइंगम चघळत बसल्याने मन एकाग्र होतं. मेंदुला चालना मिळते. मेंदुला चालना मिळाल्याने बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत होतं. तसेच फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे बॉडीमध्ये रक्तप्रवाह वेगाने होतो. हृदयाची धडधडही वाढते. त्यामुळे च्युइंग गम चघळल्याने मेंदुला पर्याप्त रक्तपुरवठा होतो.
3 / 5
च्युइंगम वजन कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे भूक शमते आणि कॅलरीज कमी करण्यास मदत होते. च्युइंगम खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. च्युइंगम दिवसभरात 11 कॅलरी प्रति तास कमी करण्याची क्षमता ठेवते. त्याचबरोबर तोंडात मोठ्या प्रमाणात लाळ तयार होत असल्याने पचनशक्तीही चांगली राहते. तसेच त्यामुळे मैदानवर खेळत असताना खेळाडूंना तहानही कमी लागते.
4 / 5
च्युइंगम सेरोटोनिन नावाचे हार्मोन सोडते, ज्यामुळे खेळाडूंचा मेंदू शांत होतो. मेंदूत कोणतेही नको त्या विचारांचा गोंधळ होतं नाही.
5 / 5
च्युइंगम चघळल्याने मेंदूला चालना मिळते, फोकस वाढतो त्यामुळे थकवा जाणवत नाही. तसेच कोणत्याही कामात तुमचे पूर्ण लक्ष एकाग्र झाल्याने झोपही लागत नाही किंवा कंटाळा येत नाही.