सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत, बॉलीवूडच्या भाईजानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याचं मजबूत व्यक्तिमत्व, फिटनेस यासह अनेक गोष्टींनी चाहते प्रभावित होतात. सध्या सलमान खान हा त्याचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकीच्या निर्णय हत्येनंतर हादरला आहे. बाबा सिद्दीकीची सलमान खानशी जवळीक असल्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याची हत्या केली होती असा अंदाज व्यक्त होत आहे. (Photo : Instagram)
या सगळ्या दरम्यान, अभिनेत्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आयकॉनिक ब्रेसलेट बद्दल बोलताना दिसला. ते ब्रेसलेट मला नकारात्मकतेपासून वाचवतं, असं तो म्हणाला होता.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी बिष्णोई टोळीने अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. आता सलमान खानचा चांगला मित्र बाबा सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली आहे. या सर्व घटनांमुळे चाहत्यांना अभिनेत्याच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. याच दरम्यान सलमान खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचं फिरोजा स्टोन ब्रेसलेट त्याचं नेहमी रक्षण करतं, असं अभिनेत्याने त्यात सांगितलं.
सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचं ब्रेसलेट उजव्या हातात घालतो. या रत्नाला फ़िरोज़ा म्हणतात, जे चांगलं नशीब आणतं आणि त्रासांपासून संरक्षण देतं असं म्हटलं जातं.
रेडिट वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान खानने निळा फिरोजी स्टोन घालण्यामागचे रहस्य उघड केले होते. सलमान खान म्हणाला होता, "माझे वडील नेहमी अशा प्रकारचे ब्रेसलेट घालायचे आणि जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा त्यांच ब्रेसलेट मला आवडलं. जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा त्यांनी मला त्यांच्यासारखेच एक ब्रेसलेट दिले" असं सलमानने सांगितलं.
याच व्हिडिओमध्ये सलमान खानने त्याच्या आयकॉनिक ब्रेसलेटची माहितीही दिली. "या स्टोनला फिरोजा म्हणतात. दोन लिव्हिंग स्टोन आहेत, त्यातला एक ग्रीक आहे आणि तर दुसरा फिरोजा आहे. माझ्या ब्रेसलेटमधला हा फिरोजा आहे. जर कोणतीही नकारात्मकता येत असेल तर संरक्षण होतं. " असं त्याने नमूद केलं.
सलमान खान सध्या छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीझन होस्ट करत आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.