हॉटेलच्या रूममध्ये शिरताच बेडखाली पाण्याची बाटली टाकायला विसरू नका; एअर होस्टेसनं काय सांगितलं कारण ?
Hotel Facts : तुम्ही बऱ्याचदा हॉटेल रूममध्ये मुक्काम करत असाल तर प्रवेश करताच सर्वात आधी बेडच्या खाली पाण्याची बाटली टाकली पाहिजे. असं का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यामागे खास कारण आहे. एका एअर होस्टेसने हॉटेलमध्ये राहणाऱ्यांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
1 / 7
आजकाल अनेक लोक हॉटेलमध्ये मुक्काम करतात.कधी सुट्टीसाठी तर कधी कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यावर हॉटेल हे राहण्यासाठी उत्तम ठिकाण ठरतं. पण अशा ठिकाणी राहताना आपल्या सुरक्षिततेची काळजी देखील घेतली पाहिजे. कारण छोट्याशा निष्काळजीपणामुळेही आपण अडचणीत सापडू शकतो. ( फोटो सौजन्य - Freepik)
2 / 7
हॉटेलच्या खोलीत राहतानाही मनात शंका येऊ शकतात. एखाद्या अनोळखी ठिकाणी राहतान मनात सतराशे साठ प्रश्न येत असतात. कुठे छुपा कॅमेरा तर नाही ना किंवा कोणी आपला पाठलाग करत नाही ना, असा सवालही अनेकांच्या मनात येतात.
3 / 7
हेच लक्षात घेऊन डच एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटने काही प्रवासी सुरक्षा टिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. हे काही हॅक आठवले तर तुम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित राहू शकाल.
4 / 7
त्यांच्या सांगण्यानुसार, हॉटेलच्या रूममध्ये घुसताच सर्वात पहिले पाण्याची एक बाटली बेडखाली टाकावी. हे काम तुमच्या सेफ्टीसाठी आहे. पण याचा सुरक्षेसाठी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडेल.
5 / 7
पण असं केल्याने जर त्या बेडखाली कोणी लपलं असेल तर लगेच कळेल. पाण्याची बाटली त्याच्यावर आदळताच तो ओरडून बाहेर यर येईल किंवा ती बाटली दुसऱ्या बाजूना बाहेर आली नाही तर तुम्हाला अलर्ट राहता येईल. पण बाटली बेडच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आली आणि कोणताच आवाज आला नाही, तर तुमच्या बेडखाली कोणीच नाही हे समजेल.
6 / 7
त्यांनी आणखीही काही टिप्स शेअर केल्या आहेत. हॉटेल रूममध्ये असताना, त्या त्यांचे शूज काढून लॉकरमध्ये ठेवतात, त्यामागेही एक विशेष कारण आहे.
7 / 7
त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा लोक महत्त्वाच्या वस्तू लॉकरमध्ये ठेवतात पण बाहेर पडताना त्या बाहेर काढायला विसरतात. शूजशिवाय बाहेर जाता येत नसल्याने शूज लॉकरमध्ये असल्यास लॉकर उघडून पाहिले जाईल. अशा प्रकारे तुमची मौल्यवान वस्तू मागे राहणार नाही.