हिवाळ्याच्या दिवसांत सगळ्यांचाच काळ उबदार कपड्यांकडे असतो. मात्र, या काळातही बरेच लोक त्यांच्या फॅशन ट्रेंडबाबत चिंतीत असतात. आपणही या चिंतेत असाल तर, या बॉलिवूड सेलिब्रेटींकडून प्रेरणा घेऊन आपल्या वॉर्डरोबमध्ये ‘या’ गोष्टी समाविष्ट करू शकता.
पॉम पॉम हॅट : जर, आपल्याला हिवाळ्यामध्ये क्युट दिसायचे असेल, तर आपण प्रियंका चोप्राच्या या पॉम पॉम हॅटमधून प्रेरणा घेऊ शकता. प्रियांकाने स्वेटशर्ट, ट्राऊझर्ससह पॉम पॉम हॅट परिधान केली आहे. या लूकमध्ये प्रियांका खूपच क्यूट दिसत आहे.
लेग वॉर्मर्स : हिवाळ्यात स्टाईलिश आणि मोहक दिसण्यासाठी आपण लेग वॉर्मर्स वापरू शकता. बूट किंवा शॉर्ट ड्रेस सोबत हे स्टाईल करू शकता. लेग वार्मर आपल्या लूकला स्टायलिश बनवेल.
बॅरेट कॅप : हिवाळ्याच्या दिवसांत बॅरेट कॅप छान लूक देते. अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच डेनिम जॅकेट आणि लॉंग स्कर्टवरहा हा लूक ट्राय केला होता. या लूकमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत होती.
फ्लिस बूट्स : हिवाळ्यातील फॅशनमध्ये लेदर बूट नेहमी ट्रेंडमध्येच राहतात. परंतु, याला पर्याय म्हणून आपण फ्लिस बूट्स वापरुन पाहू शकता. करिनाने तिच्या ट्रीप दरम्यान फ्लिस बूट्स परिधान केले होते.
इअर मफ : इयर मफ आपल्या कानांना थंडीपासून वाचवते आणि स्टाईलिश लुक देखील देते. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या कानात गुलाबी रंगाचा इअर आहे. जो बहुतेक वेळा ती आपल्या प्रवासादरम्यान परिधान करताना दिसून येते.