Winter Health Care: थंडीत मुलं पाणी कमी पितात ? असे ठेवा हायड्रेटेड
हिवाळ्यात जास्त पाणी प्यायले जात नाही, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. लहान मुलं तर थंडीत जास्त पाणी पीतही नाहीत. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता.
1 / 5
हिवाळ्यात कमी पाणी पिणे ही बहुतेक लोकांची विशेषत: लहान मुलांची सवय असते. पण यामुळे त्रास होऊ शकतो. डिहायड्रेशनमुळे त्वचाही निस्तेज दिसते. हिवाळ्यात आपण स्वतःला हायड्रेट कसे ठेवू शकतो ते जाणून घ्या.
2 / 5
नारळपाणी : असे म्हटले जाते की एका नारळाचे किंवा शहाळ्याचे पाणी हे शरीरातील पाण्याची कमतरता बर्याच प्रमाणात पूर्ण करू शकते. अनेक लोकांचा असा समज आहे की, हिवाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. पण हे खरं नाही. हिवाळ्यातही नारळपाणी सेवन केले पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात.
3 / 5
वॉटर बॉटल ट्रिक : अनेक लोकांना त्यांची पाण्याची बाटली खूप आवडते. तुम्ही याबद्दल ट्रिक वापरू शकता. जर तुमचं मूल थंडीत जास्त पाणी पित नसेल तर तुम्ही त्यांना आवडेल अशी पाण्याची बाटली आणून त्यातून त्यांना पाणी देऊ शकते. यामुळे ते त्या बाटलीशी ॲटॅच होऊ शकतात व नियमितपणे पाणी पिऊ शकतात.
4 / 5
हायड्रेटेड फळं आणि भाज्या : तुम्ही स्वत:च्या आणि मुलांच्या आहारात अशी फळं आणि भाज्यांचा समावेश करा , ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. संत्रे, किवी अशी फळं हायड्रेशनचा उत्तम स्त्रोत ठरतात.
5 / 5
खाण्यापूर्वी करा हे काम : शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी जेवणापूर्वी नेहमी एक ग्लास पाणी आवर्जून प्यावे. यामुळे दोन फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नपचनास मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे क्रेव्हिंग कमी होते.