फळांचे सेवन करणे हे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारची फळे वापरू शकता. ही फळे त्वचेला खोल पोषण देण्याचे व कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. चला जाणून घेऊया तुम्ही त्वचेसाठी कोणती फळे वापरू शकता.
डाळिंब - डाळिंब हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. त्यात इलॅजिक ॲसिड असते. त्याचे सेवन अतिनील किरणांच्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. डाळिंबाचा रस वापरून तुम्ही फेस पॅकही बनवू शकता. डाळिंबाच्या रसामध्ये बेसन, लिंबाचा रस आणि मध मिसळून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक पिगमेंटेशन दूर करण्यास मदत करतो.
पपई - पपईचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही त्वचेसाठीही पपईचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात पपईचे तुकडे मॅश करावे व ते चेहऱ्याला लावावे. हा फेसपॅक लावल्याने कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते व चेहरा चमकदार होतो.
केळं - केळ्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तर आराम मिळतोच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. यासाठी केळीचे तुकडे मॅश करून चेहऱ्याला लावा.
संत्रं - संत्रं हे फळ व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. त्वचेसाठी फेस पॅक म्हणूनही तुम्ही संत्र्याचा रस वापरू शकता. यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या. त्यात हळद आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते.