World Snake Day: सापाबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धा बाळगताना, खरे फॅक्टस काय? जाणून घ्या फोटो स्टोरीतून

| Updated on: Jul 16, 2022 | 2:16 PM

दरवर्षी 16 जुलैला जागतिक सर्प दिन साजरा केला जातो. सापांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. असे मानले जाते की साप हे अत्यंत धोकादायक आणि विषारी प्राणी आहेत ज्यांचा मुख्य उद्देश मानवांना चावणे आहे. असे मानले जाते की साप दूध पितात, त्यांच्या डोक्यात नागमणी असते. पण सापाचे दूध पिण्याच्या सिद्धांतामागील सत्य तुम्हाला माहीत आहे का?

1 / 7
 दरवर्षी 16 जुलैला जागतिक सर्प दिन   साजरा केला जातो. सापांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. असे मानले जाते की साप हे अत्यंत धोकादायक आणि विषारी प्राणी आहेत ज्यांचा मुख्य उद्देश मानवांना चावणे आहे. असे मानले जाते की साप दूध पितात, त्यांच्या डोक्यात नागमणी असते. पण सापाचे दूध पिण्याच्या सिद्धांतामागील सत्य तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित अनेक दाव्यांची सत्यता सांगणार आहोत.

2 / 7
ही केवळ अफवा आहे. साप दूध पीत नाही. वाइल्डलाइफ एसओएस वेबसाइटनुसार, साप दूध पचवू शकत नाहीत. ते सरपटणारे प्राणी आहेत ज्यांचा दुधाशी काहीही संबंध नाही. दूध केवळ सस्तन प्राण्यांशी संबंधित आहे.  जे दूध तयार करू शकतात. म्हणूनच सस्तन प्राण्यांना दूध पचवण्याची आणि आवडण्याची इच्छा असते. सापांच्या बाबतीत असे होत नाही.

3 / 7
असे म्हटले जाते, की जेव्हा साप म्हातारा होतो तेव्हा त्यांची दाढी येऊ लागते. ही देखील केवळ अफवा आहे. साप सरपटणारे प्राणी असून त्यांच्या अंगावर केस नसतात. अशा स्थितीत सापांची दाढी येत नाही. या फक्त विश्वास आणि अफवांशी संबंधित गोष्टी आहेत.

4 / 7
अनेक चित्रपट किंवा कथांमध्ये पाहिले  ऐकले असेल की सापांच्या डोक्यामागे नागमणी असतो.   नाग मणी हा कोब्रा सापांमध्ये सर्वाधिक असल्याचा दावा केला जातो. पण ही सुद्धा फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे. सापही माणसांप्रमाणेच स्नायू आणि पेशींनी बनलेले असतात. त्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा मौल्यवान दगड नाही.

5 / 7
तुम्ही या कथा खूप ऐकल्या असतील की सापाला मारल्यानंतर साप बदला घेण्यासाठी येतो किंवा तुम्ही कधी सापाला मारलं तर तुमचा फोटो त्याच्या डोळ्यात भरतो आणि त्याच्या जोडीदारापर्यंत पोहोचतो. मग तो तुला मारायला येतो.  मात्र खरे नाही असे करण्याची समजसापांना  नसते. किंवा त्याची स्मरणशक्ती अशी नाही की बदला घेण्यासाठी त्याला त्याचा चेहरा आठवतो. या अफवा चित्रपटातूनच पसरल्या आहेत.

6 / 7
तुम्ही  अनेकदा सर्पमित्रांना सापांसमोर बीन खेळताना पाहिलं असेल. साप (बासरीच्या आवाजावर साप नाचतो का) देखील त्यांची बीन वाजवताच डोलायला लागतात. मग साप खरंच बीनच्या तालावर नाचतात का? वास्तविक, सापांना इतके स्पष्ट ऐकू येत नाही की ते बीनच्या तालावर नाचतात. वास्तविक, बीन हलताना पाहून ते त्याला आपला शिकार किंवा धोका मानतात आणि ते पकडण्यासाठी त्याचे अनुकरण करू लागतात. काहीवेळा सर्पमित्र सापांना इतके प्रशिक्षण देतात की ज्या प्रकारे ते बीन हलवतात, साप त्याच प्रकारे हलतात.

7 / 7
साप बहिरे असतात  असे म्हटले जाते. म्हणजे  साप बहिरे असतात असे मानायचे का? नाही, सापांना आपल्यासारखे कान नसतात, परंतु त्यांच्या डोक्यात असे अवयव असतात जे त्यांना आवाज ऐकण्यास आणि जाणवण्यास मदत करतात. साप जमिनीवर डोके ठेवतात तेव्हा त्यांना कंपन सहज जाणवते. याशिवाय हवेतून येणारा मंद आवाज त्यांना जाणवू शकतो. त्यांना उंच आवाज ऐकणे कठीण होऊ शकते.