IND vs AUS World Cup : तुमचं काय ते बघून घ्या! ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने केले हात झटकले

| Updated on: Oct 04, 2023 | 6:10 PM

वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. भारतात वर्ल्ड कप असल्याने वर्ल्ड कपची तिकीटं आधीचं बुक झाली आहेत. त्यामुळे तिकीटांची मारामार होत असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच स्टार खेळाडू विराट कोहली आणी अनुष्का शर्मा यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

1 / 5
भारतामध्ये यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. तिकीटांची खरेदी झाली असून आता मोठी तारांबळ उडताना दिसणार आहे.

2 / 5
भारतीय खेळाडूंची दोस्त-मंडळी आता त्यांच्याकडे तिकीटांसाठी वशिला लावण्याचा प्रयत्न करतील. याआधीसुद्धा 2011 च्या वर्ल्ड कपवेळी माजी खेळाडूंनी त्यांचे तिकीटांचे किस्से सांगितले होते. आताही तसंच काही होणार यात काही शंका नाही, मात्र त्याआधी विराट कोहलीने कानाला खडा लावलेला दिसत आहे.

3 / 5
 वर्ल्ड कप जवळ येत असल्याने माझी सगळ्यांना विनंती आहे कोणीही तिकीटांची मागणी करू नका. घरूनच मॅच पाहण्याचा आनंद घ्या, अशी पोस्ट विराट कोहली याने केली आहे.

4 / 5
विराटची स्टोरी ठेवत, विराटने तुमच्या मेसेजला रिप्लाय नाही दिला तर मला कोणीही मेसेज करू नका, असं अनुष्काने आपल्या स्टोरीला ठेवलं आहे.

5 / 5
दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का यांची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. येत्या 8 ऑक्टोबरल भारताच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.