IND vs PAK : ना जडेजा ना हार्दिक सामन्याचा फिल्डर ऑफ द मॅच ठरला हा खास खेळाडू

| Updated on: Jun 10, 2024 | 8:33 PM

वर्ल्ड कपमधील अमेरिकेमधील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. भारताच्या शिलेदारांनी अशक्य शक्य करून दाखवत पाकिस्तान नांग्या पुन्हा ठेचल्या. भारताने सामना जिंकल्यावर प्रथेप्रमाणे फिल्डर ऑफ द मॅचने संघातील कोणत्या खेळाडूला गौरवण्याता आलं जाणून घ्या.

1 / 5
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी ढेपाळल्यावर रोहित शर्मानेही संघातील खेळाडूंचं मनोबल कमी होऊ दिलं नाही.

2 / 5
भारताने आपल्या 119 धावा पाकिस्तानला एखाद्या डोंगरापेक्षा कमी नाहीत हे आपल्या खेळातून दाखवून दिलं. गोलंदाजांसोबत संघातील प्रत्येक खेळाडूने फिल्डिंगमधून एक भागीदारी केली.

3 / 5
गोलंदाजांची आग ओकणारी बॉलिंग आणि खेळाडूंची चपळ चित्यासारखी फिल्डिंगने भारताच्या विजायमध्ये निर्णायक भूमिका पार पाडली. सामना झाल्यावर फिल्डर ऑफ द मॅच या पुरस्काराचं मेडल एका खास खेळाडूच्या गळ्यात पडलं.

4 / 5
सामना झाल्यावर ड्रेसिंग रूममधील हा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री यांच्या हस्ते हे मेडल भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याला देण्यात आलं.

5 / 5
फिल्डिंगमध्ये ऋषभ पंत यानेही महत्त्वाचं योगदान दिलं. पंतने विकेटमागे दोन दमदार कॅच घेतले, त्यासोबतच पठ्ठ्याने अंदाधुंद फलंदाजी करत ४२ धावांची  महत्त्वाची खेळी केली. नशिबाची साथ पंतला मिळाली आणि याचा फायदा भारतीय संघाला झाल्याचं पाहायला मिळालं.