Healthy Heart : हृदय ठेवायचं असेल फिट अँड हेल्दी तर रोज करा ही योगासनं
जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने (World Heart Day ) हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हृदयविकार दूर ठेवण्यासाठी ही योगासने रोज करा.
1 / 5
हृदयाचे आरोग्य चांगले असेल तर आपले शरीर स्वस्थ राहते. हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही योगासने उपयुक्त ठरू शकतात. योगाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे लोकांना निरोगी राहण्यास खूप मदत होते. हृदयाचे आरोग्य मजबूत करण्यासाठी, काही योगासने दररोज करणे फायदेशीर ठरते. (Photos : Freepik)
2 / 5
भुजंगासन : या योगासनाला कोब्रा पोझ असेही म्हटले जाते. यामुळे केवळ हृदयच स्वस्थ रहात नाही तर शरीरही लवचिक होतं. एवढंच नव्हे तर या आसनामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
3 / 5
दररोज करा ताडासन : हे आसन केल्याने तुमच्या हृदयाची गती सुधारते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. या आसनामुळे हृदयविकाराने त्रस्त लोकांचे आरोग्यही सुधारते.
4 / 5
वृक्षासन : हे आसन आपल्या शरीरात स्थिरता आणि संतुलन येते. असे केल्याने हृदयाचे आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.
5 / 5
वीरभद्रासन : याला वॉरिअर पोझही म्हटले जाते. हे आसन नियमित केल्याने आपले शरीर आणि हृदय यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)