जग दिसायला जितके सुंदर दिसते, तितकेच ते रहस्यमय आणि अद्भूत दिसते. तुम्ही याआधी जगातील काही अशाच अद्भूत आणि रहस्यमय गोष्टींबद्दल ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रहस्यमय गोष्टींची माहिती देणार आहोत.
जगात असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात. आश्चर्य वाटते ना, पण आफ्रिकेतील नामिबिया नावाच्या ठिकाणी ही जागा आहे. या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन वाळवंट आहे. जे जवळपास 5 दशलक्ष वर्षांहून अधिक जुनं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दिसणारे वाळूचे ढिगारे हे जगातील सर्वात मोठे असल्याचे बोललं जातं.
महाराष्ट्रात हरियल नावाचा एक पक्षी आढळतो. हा पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही. तो नेहमी उंच-उंच झाडांवर किंवा जंगलात राहणे पसंत करतो. हा पक्षी अनेकदा पिंपळ किंवा वटवृक्षांवर आपले घरटे बांधतो. विशेष म्हणजे हरियल पक्ष्यांचा थवा आढळतो.
जगभरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई असताना जगातील एका देशात पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक साठा आहे. ब्राझीलमध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक स्त्रोत उपलब्ध आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक 8,233 घन किलोमीटर नूतनीकरण योग्य पाण्याचे स्त्रोत (Renewable water resources) आहे.
मेघालयातील मावळियानांग या गावात वाहणारी 'उमंगोट नदी' ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी प्रदूषित करणाऱ्यांकडून 5000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जातो.