World Women`s day | जागतिक महिला दिन विशेष, पुण्यात रॅली काढून महिला शक्तीचा जागर
पुण्यातील राजगुरु नगरमध्ये दुचाकी रॅली काढून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना भगवे फेटे घालून रॅली काढली. शहरात महिलांना रॅली काढून महिला शक्तीचा जागर केला.
-
-
जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त रॅली काढून महिला दिन साजरा केला जातो आहे.
-
-
पुण्यातील राजगुरु नगरमध्ये दुचाकी रॅली काढून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेली महिलांना दुचाकी रॅली काढली होती.
-
-
पुण्यातील राजगुरु नगर येथे महिलांनी क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी घोषणा देखील देण्यात आल्या.
-
-
महिला दिनानिमित्त राजगुरु नगरमधील महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या आणि फेटे घातले होते. भगव्या साड्या आणि फेट्यांमुळे रॅली लक्षवेधी ठरली.
-
-
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीनंतर महिलांनी फोटोसेशन केलं. या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करत महिलांनी महिला दिन विशेष साजरा केला..