बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय त्याच्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार वाराणसीला पोहोचला. त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी चिल्लरही उपस्थित होती. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी सम्राट पृथ्वीराजांच्या ध्वजाने गंगेची पूजा केली
पराक्रमी राजाच्या शौर्याला आदरांजली म्हणून संघ सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा ध्वज प्रमुख शहरांमध्ये घेऊन जात आहे असे त्याने म्हटले आहे, या चित्रपटात अक्षय कुमार महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे.
या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.तिने चित्रपटात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली आहे.
'सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आपले प्राण दिले. आपला देश लुटू पाहणाऱ्या निर्दयी आक्रमणकर्त्या मोहम्मद घोरीविरुद्ध त्याने भारताचे रक्षण केले. आमचा चित्रपट सम्राट पृथ्वीराज यांचे जीवन आणि त्यांच्या देशाच्या इतिहासातील योगदानाचे वर्णन करतो ते मत डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे.