2021 साली म्हणजेच गेल्या वर्षी शी जिनपिंग यांना सेरेब्रल एन्यूरीझम नावाच्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याचीही माहिती आहे.
ऑपरेशन ऐवजी जिनपिंग हे पारंपारीक चायनीज औषधांचे उपचार घेत असल्याचंही वृत्त समोर आलं आहे.
सेरेब्रल एन्यूरीझम म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीत अवाजवी वाढ, त्याची गाठ तयार होते आणि ती गाठ हळूहळू मोठी होत जाते.
ती गाठ मेंदूच्या शेजारच्या नसांना ती दाबू लागते, त्यातून प्रसंगी जीव जाण्याचाही धोका असतो.
हा आजार बरा नाही झाला तर जिनपिंग यांची दृष्टी जाण्याचा धोका आहेत. त्याचबरोबर त्यांना तोलही जाण्याचा त्रासही जाणवू शकतो.
जिनपिंग यांच्या प्रकृतीबद्दल आधीच साशंकता व्यक्त केली जातेय कारण बिजिंग विंटर ऑलंपिकपर्यंत त्यांनी विदेशी नेत्यांना भेटणे त्यांनी टाळलं.
2019 मध्ये इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना ते चालताना लचकत होते तसच बसताना आधार घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं.
2020 च्या ऑक्टोबरमध्ये ते एका कार्यक्रमात सारखे खोकत होते. तसच त्यांचं भाषणही स्लो चाललेलं होतं, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.