भरपूर पाणी प्या - मिठाई, गोड पदार्थ खाऊनही तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्यावे. प्रत्येकाने दिवसभरात कमीतकमी 7-8 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे मेटाबॉलिज्म सक्रीय राहतं आणि शरीरात अतिरिक्त फॅट जमा होत नाही. पाणी प्यायल्याने पचनही चांगलं राहतं, अपचन होत नाही. पाण्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Photos : Freepik)
नियमित चालणं पाहिजेच - दिवाळीत कितीही बिझी असलात तरी त्यातूनही वेल काढून 30 मिनिट चाललात तर ते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. दररोज अर्धा तास चालावे, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त चरबी घामाद्वारे बाहेर पडते. सणासुदीच्या काळात नियमित चालण्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहतेच पण मिठाई खाण्याचा आनंदही घेता येतो.
फायबर आणि प्रोटीनयुक्त आहार - तळलेले पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात. पण आहारात आहारात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला तर पचनसंस्था अधिक चांगले काम करू शकते. फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्याने फक्त पचनशक्ती मजबूत होत नाही, तर पोट बराच काळ भरलेले रहातं आणि सारखी भूक लागत नाही. यामुळे मिठाई किंवा गोड पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग कमी होते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
संतुलित आहार घ्या - सणासुदीच्या काळात आहार संतुलित ठेवणे गरजेचे आहे. मिठाई खाल्ल्यानंतर हलकं जेवा, ज्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण संतुलित राहील. याशिवाय कोशिंबीर, फळे आणि हलका नाश्ता असा आहार असावा. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील आणि मिठाईतून येणाऱ्या अतिरिक्त चरबीचा प्रभाव कमी होईल.
योग आणि मेडिटेशन - योग आणि मेडिटेशन केल्यामुळे केवळ तुमचे शरीर तंदुरुस्त रहात नाही तर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता. यामुळे तणाव कमी होतो आणि मिठाई खाताना अपराधीपणाची भावना टाळता येते. तसेच, सूर्यनमस्कार, भुजंगासन आणि प्राणायाम यासारखी काही योगासने तुमचे मेटाबॉलिज्म सुधारू शकते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)