या गोष्टींच्या वापराने दात किडण्याची समस्या होईल दूर, मिळेल आराम
काहीवेळा ओरल केअर रूटीनचे नियमित पालन केल्यानंतरही दातात कीड निर्माण होण्याची समस्या सतावते. अशावेळी दरवेळेस डेन्टिस्टकडे जाण्यापेक्षा काही सोप्या घरगुती उपायांमुळे हा त्रास दूर होऊ शकतो.
1 / 7
दातांची योग्य काळजी घेऊनही काही वेळा दातात कीड निर्माण होऊ शकते. अशा वेळी बहुतांश लोक डेन्टिस्टकडे जाण्याचा मार्ग अवलंबतात. जर तुमचेही दात किडले असतील, त्यामुळे त्रास होत असेल तर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून हा त्रास कमी करू शकता. पण खूप जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे अवश्य जावे. (फोटो : Freepik)
2 / 7
दातांची कीड दूर करण्यासाठी तेलाने गुळणी करणे हा उपाय अनेक शतकांपासून सुरू आहे. अशावेळी एक चमचा तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल तोंडात भरा आणि तोंडात 20 मिनिटे ठेवून गुळण्या करा. नंतर तेलाची चूळ भरून पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे. (फोटो : Freepik)
3 / 7
कोरफडीमध्ये अनेक अँटी-बॅक्टेरिअल घटक असतात, त्याच्या वापरानेही दाताची कीड कमी होऊन आराम मिळू शकतो. त्यासाठी कोरफडीचे जेल हे टी ट्री ऑइलमध्ये मिसळून दातांवर लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. (फोटो : Freepik)
4 / 7
दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त गोष्टींचे सेवन करू शकता. अशा परिस्थितीत फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. यामुळे दातांना कीड लागणे टाळू शकता. (फोटो : Freepik)
5 / 7
साखरयुक्त अन्न आणि पेय यांच्यामुळे दातांना कीड लागणे वाढू शकते. जागतिक आरोग्य संघटनेतर्फेही साखरमुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत गोड पदार्थांचे सेवन टाळून तुम्ही दातांना कीड लागणे टाळू शकता. (फोटो : Freepik)
6 / 7
शुगर फ्री च्युइंगम खाल्ल्याने दातांमधील बॅक्टेरियाही कमी होतात. अशावेळी जेवणानंतर रोज शुगर फ्री च्युइंगम चावून खावे. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरियामुळे दातांना इजा होत नाही. (फोटो : Freepik)
7 / 7
कॅल्शियम समृद्ध अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये टायटॅनियम ऑक्साईड असते. जे ॲसिडिक गोष्टींपासून दातांचे संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया होत नाहीत आणि दातांना कीड लागण्याची शक्यता खूप कमी होते. (फोटो : Freepik)