आपली पचनसंस्था अनेक आरोग्य समस्यांचे मूळ आहे, असे म्हटले जाते. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपल्यापैकी बहुतेक लोक सकाळची सुरुवात काही पदार्थ खाऊन चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे पचनक्रिया खराब होते. सकाळी काही पदार्थ खाण्याची चूक करू नका.
आंबट फळे : फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपल्याला माहित आहे, परंतु ती रिकाम्या पोटी खाणे नुकसानदायक ठरते. संत्री, अननस, किवी, लिंबू आणि पेरू सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोट जड होऊ शकते. त्यामुळे मेटाबॉलिज्म मंद होते व पोटही दिवसभर अस्वस्थ राहते.
कच्च्या भाज्या : रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाणे टाळा. भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे आपल्या पोटाला पचायला कठीण असते. नाश्त्यात कच्च्या भाज्या खाल्ल्याने तुमचा संपूर्ण दिवस गॅस, पोटदुखीने खराब होऊ शकतो.
बेकरीतील पदार्थ : तुम्हाला केक, पिझ्झा, पेस्ट्री खूप आवडत असेल तरी सकाळच्या नाश्त्यात ते खाणे योग्य नाही. अशा पदार्थांमध्ये यीस्ट असते, जे रिकाम्या पोटाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे गॅसेसारख्या समस्या सुरू होतात. त्यामुळे सकाळी अशा पदार्थांचे सेवन करण्याची चूक करू नका.
मसालेदार पदार्थ : सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुमच्या पोटातील अस्तराला त्रास होऊ शकतो आणि सकाळी मलत्याग करणे कठीण होऊ शकते. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यात मसालेदार पदार्थ खाणे शहाणपणाचे नाही. यामुळे दिवसभर पोट खराब राहू शकते.
चॉकलेट्स : साखरयुक्त पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रोटीन बारने करतात, परंतु उठल्याबरोबर चॉकलेट खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रक्रिया केलेली साखर ही रिकाम्या पोटी खाण्याची सर्वात वाईट गोष्ट आहे. केवळ चॉकलेटच नाही तर साखरयुक्त पदार्थ आणि पेयेही टाळावीत.