Marathi News Photo gallery Yuvraj singh birthday Five Top Unbreakable Records of Sixer King Yuvraj Singh latest marathi sports news
Yuvraj Singh Birthday | सिक्सर किंग युवराज सिंहचे टॉप 5 अनब्रेकेबल रेकॉर्ड्स
Yuvraj Singh top records : टीम इंडियाचा छावा असलेल्या युवराज सिंहचा आज 42 वा वाढदिवस आहे. पठ्ठ्याने अनेक तगडे रेकॉर्ड रचत आपली ताकद सर्वांना दाखवून दिलीय. काही असे रेकॉर्ड अजून कोणालाच मोडता आले नाहीत.
1 / 5
युवराज सिंहन असा एकमेक खेळाडू आहे ज्याला वन डे अंडर-19 आणि 2011 च्या वन ड वर्ल्ड कपमध्ये त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.
2 / 5
वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.
3 / 5
युवराजने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. अवघ्या 12 बॉलमध्ये युवराज सिंह याने त्यावेळी अर्धशतकी खेळी केली होती.
4 / 5
युवराज सिंहने आयपीएलमध्ये एकाच सीझनमध्ये दोनवेळा हॅट्रीक घेण्याची किमया केली होती. 2009 मध्ये आरसीबी आणि डेक्कन चार्जसविरूद्ध त्याने हॅट्रीक घेतली होती.
5 / 5
युवराजला IPL लिलावात 2015 च्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला ₹16 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळी युवराज लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनलेला.