वर्ल्ड कप 2023 चा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. दहा संघ सहभागी असून ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत. अशातच युवराज सिंह याने कोणते चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील सांगितलं आहे.
भारताने वर्ल्ड कपआधी आशिया कपवर नाव करत विजेतेपदावर नाव कोरत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यानंतरची ऑस्ट्रलियासोबतची वन डे सीरीजही जिंकली आहे.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये कोण जाणार याबाबत अनेक आजी-माजी खेळाडू भाकीत करत आहेत. अशातच युवराजनेही सेमी फायनलमध्ये जाणाऱ्या संघाची नावे त्याने सांगितली आहेत.
सिक्सर सिंगच्या मते वर्ल्ड कप 2023 च्या मते सेमी फायनलमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड आणि इंग्लंड चार संघ एन्ट्री करतील. त्यासोबतच आफ्रिका संघालाही विसरून चालणार नसल्याचं युवराज म्हणाला.
दरम्यान, वर्ल्ड कपसाठी जो भारतीय संघ निवडला आहे त्यामध्ये युजवेंद्र चहल याला संधी मिळायल हवी होती. तो नाहीतर वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळायला हवी होती, असंही युवराजने सांगितलं.