कोल्हापूर: पी.एम. किसान योजनेचा (P.M. Kisan Yojana) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पीएम किसान योजनेतून आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी अनेकदा संबंधित यंत्रणांकडे केली आहे. मात्र तरी देखील राजू शेट्टी यांच्या खात्यात पी.एम. किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा झाला आहे. परंतु हप्ता जमा झाल्यानंतर शेट्टी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या खात्यातील पी. एम. किसानचे पैसे (money) पुन्हा तहसीलदारांकडे जमा केले आहेत.
राजू शेट्टी यांनी अनेकदा संबंधित यंत्रणांकडे आपले नाव या योजनेतून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे. आपण माजी खासदार असल्याने या योजनेतून माझे नाव वगळण्यात यावे असे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.
मात्र तरी देखील पी.एम. किसान योजनेतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे.
माजी खासदार असल्याने माझे नाव या योजनेतून वगळा अशी लेखी मागणी राजू शेट्टी यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तरी देखील शेट्टी यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने हप्त्याचे सर्व पैसे शेट्टी यांनी तहसीलदारांकडे परत केले आहेत.
वारंवार विनंती करून देखील आपल्या खात्यात पुन्हा पीएम किसानचे पैसे जमा झाल्याने राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नको असणाऱ्यांना पैसे मिळतात, मात्र खरे लाभार्थी अद्यापही या योजनेपासून वंचित राहत असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.
खात्यात पैसे जमा होताच शेट्टी यांनी आपले 11 व्या हप्त्याचे पैसे पुन्हा तहसीलदारांकडे परत केले आहेत. या कृतीमुळे शेट्टी यांच कौतुक होत आहे.