5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?

| Updated on: Aug 24, 2019 | 8:47 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. […]

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. या तिघांनाही आपल्या मृत्यूची चाहूल खूप अगोदर लागली होती का? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो आहे.

सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रिकर या तिन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या मृत्यूच्या बरोबर अगोदर महत्त्वाची पदे सोडली होती. यापैकी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातून संरक्षणमंत्री पद सोडत गोव्यात येण्यास पसंती दिली. यावेळी त्यांनी अखेरपर्यंत गोवा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी शेवटच्या काळात कोणतेही पद घेतले नाही. सुषमा स्वराज यांनी तर निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला. अरुण जेटली यांनी देखील प्रकृतीचे कारण देत कोणतंही मंत्रीपद घेण्यास नकार दिला.

मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे तिन्ही नेते आपल्या शेवटच्या काळापर्यंत सार्वजनिक आयुष्यात कार्यरत होते. त्यांनी नेहमीच लोकांशी संवाद कायम ठेवला होता. तिघांनीही केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांवर काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच योग्यवेळी महत्त्वाच्या पदावरुन पायउतारही केला. अखेरपर्यंत आपल्यालाच मंत्रीपद हवे, असा अट्टाहास करणाऱ्या राजकीय संस्कृतीत या सर्वांचेच वेगळेपण उठून दिसणारे आहे. समाज माध्यमांवरही त्यांच्या या गुणांची स्तुती होताना पाहायला मिळत आहे.