विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी 3377 कोटीच्या पुरवणी मागण्यांना मंजूरी मिळाली आहे. या ओबीसी विभागासाठीच्या योजनांसाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेतला होता. ओबीसी विभाग स्थापण झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद असल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी पेक्षा ही तरदूत 3081 कोटी रुपयेअधिक आहेत.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 3377 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या मंजुरीनंतर ओबीसी विभागाचे 2023-24 च्या योजनांसाठी तरतूद 7873 कोटी इतकी झाली आहे. ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 3081 कोटी अधिक आहे.
या निधीतून मोदी आवास योजनेसाठी 1 हजार कोटींची तरतूद आहे. महाज्योतीसाठी 269 कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 158 कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी 56 कोटी, अमृत संस्थेसाठी 15 कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1192 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोग 360 कोटी, ओबीसी आणि व्हीजेएनटी महामंडळासाठी 20 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना शैक्षणिक आणि सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.