Assembly Election 2023 Final Result : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल? सर्वात आधी निकाल tv9 वर पाह्ण्यासाठी येथे भेट द्या

| Updated on: Dec 03, 2023 | 8:54 AM

5 State Assembly Election Result 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ आहे. तर, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात कॉंग्रेस बहुमताजवळ आहे. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Assembly Election 2023 Final Result : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल? सर्वात आधी निकाल tv9 वर पाह्ण्यासाठी येथे भेट द्या
Assembly Election 2023 Final Result
Image Credit source: Assembly Election 2023 Final Result
Follow us on

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार होता. मात्र, यापैकी मिझोरम वगळता आता राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. मिझोराम विधानसभेची मतमोजणी सोमवारी 4 डिसेंबर रोजी होईल. निकालापूर्वी विविध एजन्सीनी राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कॉंग्रेसचा हा आनंद किती काळ टिकणार याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

राजस्थानमध्ये बहुमत कुणाकडे?

चार राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला ( bjp ) 100 ते 110 आणि काँग्रेसला (congress ) 90 ते 100 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अपक्ष यांना 5 ते 10 जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे. राजस्थान विधानसभेच्या एकूण 199 जागांसाठी उद्या निकाल लागणार आहे. राजस्थानमध्ये मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध कॉंग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.

मध्य प्रदेशमध्ये सत्ता पालटणार?

मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ आहे. काँग्रेसला 111 ते 121 आणि भाजपला 106 ते 116 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात येथे कॉंग्रेसच्या विक्रम मस्ताल यांनी दंड थोपटले आहेत. तर माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे कमलनाथ यांना भाजपच्या बंटी साहू यांनी आव्हान दिलंय.

हे सुद्धा वाचा

तेलंगणामध्ये मोहम्मद अझरुद्दीन याचा सामना कुणाशी ?

तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. सी आर यांच्या बीआरएस आणि कॉंगेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होईल. एक्झिट पोलनुसार भाजपला येथे केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावे लागेल. तर प्रमुख लढती असलेल्या बीआरएसला 48 ते 58 आणि काँग्रेसला 49 ते 59 असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, येथे एमआयएमची भूमिका ही किंगमेकरची असणारा आहे. एमआयएमला येथे 6 ते 8 जागा मिळतील असे एक्झिट पोल सांगत आहे. मुख्यमंत्री केसीआर राव विरुद्ध भाजपचे ई. राजेंद्र या प्रमुख लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन हे ही काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा सामना बीआरएसच्या मंगती गोपीनाथ यांच्याशी होत आहे.

छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांपैकी कॉंग्रेसला 46 ते 56 तर भाजपला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. इतर पक्षांनाही 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भुपेश बघेल विरुद्ध त्याचे चुलते भाजपचे विजय बघेल अशी प्रमुख लढत होणार आहे. एक्झिट पोलने वर्तविलेला अंदाज खरा ठरी की मतदारांचा कौल याचा फैसला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल TV9 मराठीवर पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या

TV9 मराठी यूट्यूब Live TV : https://www.youtube.com/watch?v=04y0H01GTg0

TV9 मराठी Official Live TV : https://www.tv9marathi.com/live-tv

TV9 मराठी Vidhansabha Election live Coverage : https://www.tv9marathi.com/elections

TV9 मराठी Live Blog Link : https://www.tv9marathi.com/politics/4-state-assembly-election-result-2023-on-3-decembar-2023-for-rajasthan-madhya-pradesh-chhattisgarh-telangana-elections-news-in-marathi-1084056.html