Exit Poll Result 2023 : उद्या येणार पाच राज्यांचा एक्झिट पोल, कुणाची हार, कुणाची जीत? एक्झिट पोलमधील मुद्द्यांचे गणित काय?

| Updated on: Nov 29, 2023 | 4:10 PM

5 State Assembly Election Exit Poll Result 2023 Date : आतापर्यंत जे ग्राउंड रिपोर्ट्स मांडण्यात आले त्यानुसार तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराममध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशीच लढाई होण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता मतदान झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप एक्झिट पोलचे आकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Exit Poll Result 2023 : उद्या येणार पाच राज्यांचा एक्झिट पोल, कुणाची हार, कुणाची जीत? एक्झिट पोलमधील मुद्द्यांचे गणित काय?
5 STATE Assembly Election 2023, PM NARENDRA MODI VS RAHUL GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

Assembly Election 2023 | 28 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक यासाठी तेलंगणा वगळता सर्वत्र मतदान पूर्ण झाले आहे. ३ डिसेंबरला पाचही राज्याचे निकाल लागतील. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार मतमोजणीचा टप्पा ठरविण्यात येणार आहे. तर, पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असेल. प्रत्येक फेरीच्या मोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत भाजप-काँग्रेससह सर्वच प्रादेशिक पक्षांचे भवितव्य पणाला लागले आहे. दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आणि भाजप नेत्यांची अस्वस्थता सातत्याने वाढू लागली आहे.

पाच राज्यांचा एक्झिट पोलमध्ये काय आहे?

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा एक्झिट पोल (Exit Poll) उद्या दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ला जाहीर होणार आहे. तर, मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. आतापर्यंत जे ग्राउंड रिपोर्ट्स मांडण्यात आले त्यानुसार भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशीच लढाई होण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता मतदान झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप एक्झिट पोलचे आकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आपापल्या स्रोतांचा माध्यमातून हे दोन्ही पक्ष हे जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या घरी ये जा वाढली

कॉंग्रेस आणि भाजप दोघेही आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. एका एजन्सीच्या पाहणी अहवालानुसार जेथे काँग्रेस जिंकत आहे. त्यानुसार काँग्रेस आणि भाजपचे आकडे वेगळे आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या अहवालाच्या आधारे पुढील तयारीला लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कमलनाथ यांच्या घरी संभाव्य आमदारांनी हजेरी लावणे सुरू केले आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निकटवर्तीय आमदार, उमेदवार यांनीही त्यांच्याशी संपर्क साधायला सुरवात केलीय.

हे सुद्धा वाचा

इंडिया आघाडीच्या बैठकीची मागणी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपला. आता निकाल येईल. राज्य सरकार स्थापन होतील. त्यामुळे आणखी काही दिवस यामध्ये जाणार आहेत. त्याचवेळी लोक्स्बः निवडणुकांच्या तयारीसाठी प्रत्येक पक्षाला वेळ मिळावा यासाठी भारत आघाडीमध्ये असलेल्या प्रादेशिक पक्षांनी बैठकीची मागणी केली आहे. पुढच्या बैठकीची तारीख लवकरात लवकर जाहीर व्हावी यासाठी काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

ओबीसींचा मुद्दा महत्वाचा

गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या विरोधी पक्षांनी ओबीसीशी संबंधित प्रश्न आक्रमकपणे मांडत आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये हा मुद्दा कमी प्रभावी आहे. परंतु, काँग्रेसने या दोन्ही राज्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जात जनगणना हा मुद्दा मांडला आहे. बिहारमध्ये महाआघाडी सरकारने जाती जनगणनेचे आकडे जाहीर केले. तेथील आरक्षण मर्यादा 75 टक्के केली. या घडामोडीमुळे भाजपच्या ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ओबीसी या मुद्द्यावर पक्षाची खरी भूमिका काय आहे हेच अनेक नेत्यांना माहित नाही. त्यामुळे नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पक्षनेतृत्वाने या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

मुख्यमंत्री बदलणार का?

भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलणार अशी एक चर्चा भाजपमध्येच सुरु आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या उत्तराधिकार्‍यांचा शोधही सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर हा बदल होईल अशी माहिती मिळतेय. अलीकडच्या काळात भाजपने अनेक राज्यांत मुख्यमंत्री बदलले. त्यावेळची कारणे आणि आताचे कारण निराळे आहे. आता मुख्यमंत्री हटाव नाही तर त्यांना स्वेच्छेने पायउतार व्हावे लागेल. त्यासाठी वैयक्तिक कारण पुढे करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर दुसरी जबाबदारीही त्यांना देण्यात येणार नाही. पुढे हे पद कुणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. सक्षम पर्याय उपलब्ध होताच त्यांना पद सोडण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.