मोदींच्या मंत्रिमंडळात 90 टक्के कोट्यधीश मंत्री

| Updated on: May 31, 2019 | 2:21 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रचंड विजय मिळवला. मोदींनी काल ( 30 मे) आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 57 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र प्रभार आणि 24 राज्यमंत्री बनवण्यात आले आहेत. मोदींच्या या मंत्रिमंडळात 90 टक्के मंत्री हे सर्वाधिक […]

मोदींच्या मंत्रिमंडळात 90 टक्के कोट्यधीश मंत्री
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रचंड विजय मिळवला. मोदींनी काल ( 30 मे) आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 57 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र प्रभार आणि 24 राज्यमंत्री बनवण्यात आले आहेत. मोदींच्या या मंत्रिमंडळात 90 टक्के मंत्री हे सर्वाधिक कोट्यधीश आहेत.

मोदी सरकारच्या तयार करण्यात आलेल्या मंत्रिमंडळात केवळ 5 मंत्री असे आहेत ज्यांच्याकडे एक कोटींपेक्षा कमी संपत्ती आहे. यामध्ये 10 असे मंत्री आहेत त्यांची एकूण संपत्ती 20 केोटींपेक्षा अधिक आहे.

भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकालापेक्षा यंदाच्या कार्यकालाची तुलना केली तर, यावेळी कोट्यधीश मंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2014 मध्ये 4 असे मंत्री होते त्यांच्याकडे एक कोटीपेक्षा कमी संपत्ती होती. तर 13 मंत्री असे होते की त्यांच्याकडे एकूण 20 कोटीपेक्षा अधिक संपत्ती होती.

यंदाच्या 2019 मंत्रिमंडळात सरकारमध्ये 21 असे मंत्री आहेत त्यांच्याकडे 5 कोटी पेक्षा कमी संपत्ती आहे. 2014 मध्ये अशा मंत्र्यांची संख्या 24 होती. मोदींच्या मंत्रिमंडळात 14 असे मंत्री आहेत त्यांची संपत्ती 10 कोटींपेक्षा कमी आहे. 2014 मध्ये अशा मंत्र्यांची संख्या 4 होती.

मोदी मंत्रिमंडळात असे 7 खासदार आहे त्यांची एकूण संपत्ती 20 कोटींपेक्षा कमी आहे. 2014 मध्ये अशा मंत्र्यांची संख्या 4 होती. हे आकडे पाहून अनेकजण प्रश्न करत आहेत, सरकारमध्ये श्रीमंत लोकांची संख्या कशी वाढत आहे.